01 August, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन

हिंगोली, दि. 1 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, निवडणुक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आदिंसह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

                                                            ***** 
 

No comments: