सणवार समारंभात फटाके पशुपक्षांपासून दूर फोडण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 10 :
अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ पशुसंवर्धन
आयुक्तालय यांनी राज्यातील पशु व पक्षांना फटाक्यांच्या ध्वनी प्रदुषंणाचा त्रास
होत असल्याने मुके पशु पक्षी तीव्र ताण व दडपणाखाली जगत असतात. प्रत्येक
सणवाराच्या व समारंभाच्या वेळी फोडण्यात येणाऱ्या फटाक्याबाबत सर्वसामान्य
नागरिकांना याबाबत जनजागृती करून पशुपक्षांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे
आवश्यक आहे.
पशुपक्षांना अन्न पुरवठा करणाऱ्या
जागेजवळ, झाडामध्ये असणाऱ्या घरट्यांपासून तसेच संग्रहालय आणि राष्ट्रीय
उद्यानाच्या जवळ फटाके वाजवण्यास प्रतिबंध आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या
वतीने करण्यात येत आहे.
*****
No comments:
Post a Comment