पालकमंत्री
दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली
दि. 11 : राज्याचे
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप
व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे
हे दि. 13,
14 व 15 ऑगस्ट, 2017 रोजी
या कालावधीत हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
रविवार, दि. 13 ऑगस्ट, 2017 रोजी दुपारी 03.00 वाजता
शासकीय विश्रामगृह वाशिम येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी 04.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली
येथे आगमन. रात्री मुक्काम हिंगोली.
सोमवार,
दि. 14 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली
येथे राखीव. दुपारी 03.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून शासकीय वाहनाने सेनगाव
जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 03.55 वाजता सेनगाव येथे आगमन. दुपारी 04.00 वाजता प्रभाग
क्र. 16, अण्णाभाऊ साठे नगर, सेनगाव जि. हिंगोली येथे मातंग समाज परिवर्तन मेळावा व
गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा (संपर्क श्री. बबन सुतार मो. 9552014565/8390892089).
सायंकाळी 07.00 वाजता सेनगाव जि. हिंगोली येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली
येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार,
दि. 15 ऑगस्ट, 2017 सकाळी 09.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय
स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण. सकाळी 11.00 वाजता शासकीय
विश्रामगृह हिंगोली येथून शासकीय वाहनाने जिंतूर-जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment