11 August, 2017

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करावेत
हिंगोली दि. 11 : सन 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये महामंडळाच्या राज्य शासन पुरस्कृत 50 टक्के योजना व बीज भांडवल योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांना महामंडळाच्या www.mahatmaphulecorporation.com/applications या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
तरी इच्छूक अर्जदारांनी त्यांचे स्वत:चे ई-मेल अकाऊंट वापरून ऑनलाईन पध्दतीने दि. 16 ऑगस्ट, 2017 ते दि. 15 सप्टेंबर, 2017 या कालावधीत कर्ज मिळण्याकरिता कर्ज मागणीसाठी अर्ज करावा. तसेच ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी दि. 14 ऑक्टोबर, 2017 पर्यंत मागणी अर्जाची मुळ प्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित/स्वयंसाक्षांकित प्रती जिल्हा कार्यालयात स्वत: सादर करावीत. त्रयस्थ व्यक्तीकडून अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: