गट शेती योजनेसाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 24 : एका
समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामूहिकरित्या नियोजनबद्ध शेती करणे,
शेतमालावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, एकत्रित साठवण करणे, एकत्रित विपणनासाठी सामूहिक
सुविधा निर्माण करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे,
एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम व्यवसाय, दुग्धव्यवसाय या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत
दुप्पट करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या
गट शेतीस चालना देणे ही नवीन योजना राबविण्याचे ठरवले आहे.
त्यानुषंगाने
जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपन्यांनी
आपले अर्ज आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दि. १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत दाखल
करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा हिंगोली यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment