अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास
महामंडळाअंतर्गत
बीजभाडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 24 : महाराष्ट्रातील ज्या जातीजमातींच्या सुशिक्षित बेरोजगारासाठी
कर्ज योजनेबाबत कोणतेही महामंडळ उपलब्ध नाही, अशा खुल्या प्रवर्गातील जाती / जमातीसाठी
हिंगोली जिल्ह्याचे रहिवासी असणाऱ्या 18 ते 45 या वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी
ही बीजभाडवल कर्ज योजना आहे. यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना जास्तीत-जास्त रु. 5 लक्ष
इतक्या रक्कमेएवढे कर्ज देण्यात येते. यामध्ये 60 टक्के हिस्सा दत्तक बँकेचा, 35 टक्के
हिस्सा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा तर 5 टक्के हिस्सा स्वत:चा असावा.
सदरील
योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी सन 2017 साठी 80 कर्जप्रकरणे मंजूर करण्याचे लक्ष्य
ठेवले आहे. गरजूंनी सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahaswayam.in या वेबपोर्टलवर लॉग इन करावे, असे आवाहन अण्णासाहेब
पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नोडल अधिकारी हिंगोली यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,
दुसरा मजला, हिंगोली येथे संपर्क साधावा.
*****
No comments:
Post a Comment