नेत्रदान पंधरवडा शिबीराचे आयोजन
हिंगोली, दि. 24 : प्रतिवर्षी नेत्रदान पंधरवडा हा दि. 25 आगस्ट ते 8 सप्टेंबर
या कालावधीत आयोजन करण्यात येतो. या पंधरवाड्यात ज्या नागरिकांनी जिल्हा रुग्णालय हिंगोली
व अधिनस्त रुग्णालये येथे जावून नेत्रदान संमती भरुन द्यावे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण
कार्यक्रम व जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यात राबविल्या
जाणाऱ्या 32 वा नेत्रदान पंधरवडा शिबीराचे आयोजन समारंभ दि. 25 ऑगस्ट, 2017 ते दि.
08 सप्टेंबर, 2017 या कालावधीत रविवार वगळून साजरा होत आहे.
नेत्रदान
पंधरवडा साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नेत्रदान संमती पत्र भरुन घेणे व नेत्रदानाविषयी
माहिती देणे तसेच नेत्रविकार नेत्र विकाराचा प्रतिबंध निदान आणि व्यवस्थापन करणे हा
हेतु आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी
कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment