पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या
हस्ते
‘आपला जिल्हा हिंगोली’ माहिती
पुस्तिकेच विमोचन
हिंगोली, दि.15: भारतीय स्वातंत्र्य
दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या
अधिनस्त जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांनी तयार केलेल्या ‘आपला जिल्हा हिंगोली’
या माहिती पुस्तिकेसह ‘हिंगोली जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल’ या घडिपत्रिकेचे पालकमंत्री
श्री. दिलीप कांबळे यांनी विमोचन केले. सदर माहिती पुस्तिका आणि घडिपत्रिकेतील माहिती
ही नागरिकांसाठी उपयोगी ठरेल असे ही पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले.
यावेळी
जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस
अधिक्षक अरविंद चावरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment