अनुसूचित जातीच्या
प्रवर्गाकरीता फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण
हिंगोली, दि. 2 : स्थानिक हिंगोली तालुक्यातील येथे अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता विशेष घटक
योजने अंतर्गत फॅशन डिझाइन वर आधारित एक महिना कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन
करण्यातआले आहे. सदर कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र, एम. सी. ई. डी. हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे या
कार्यक्रमातुन स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात फॅशन डिझाईन नियोजन कसे
करावे, पिनो, ए लाईल पॅटर्न, फ्रॉक, ब्लाऊज, परकर, सलवार सुट विविध प्रकारचे या
प्रकारचे अनेक तांत्रिक प्रात्यक्षिकरित्या प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सोबतच
व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची
कार्यप्रणाली, आदीबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या
प्रशिक्षण कार्यक्रमात महिला व युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18
ते 45, शिक्षण 7 वी पास, शिक्षण सुरू नसावे. जातीचे प्रमाणपत्र नॅशनल बँकेचे
पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे. प्रवेशाची अंतिम तारीख 07 ऑगस्ट, 2017 च्या दुपारी
4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजक विकास उंडाळ मो. 8412089272/8390201549 एमसीईडी
व्दारा एस-12, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर
करावा या कार्यक्रमाच्या मुलाखती दि. 09 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 12.00 वाजता
आयोजित करण्यात आले आहेत. असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक व
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment