01 August, 2017

गावपातळीवर जन्म मृत्यु नियमित नोंद करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 31 : गावपातळीवर जन्म मृत्यु निबंधक हे ग्रामसेवक असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नियमित व 100 टक्के जन्म मृत्युची नोंद करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक जन्म मृत्युची नोंदणी नियमित करून घेत नसतील अशा सर्व ग्रामसेवक यांचेवर जबाबदारी निश्चित करून कामात सुधारणा करण्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी निर्देश दिले आहे.
तसेच ज्या ग्रामपंचायतीची जन्म मृत्यु नोंदणीचे काम (माहे जानेवारी ते मे 2017 पर्यंत) शुन्य आहे. अशा सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना जिल्हाधिकारी यांचे पुढील बैठकीमध्ये अहवालासह उपस्थित राहावे तसेच जन्म मृत्यु नोंदणी कामाबाबत आपल्या स्तरावरील दरमहाच्या बैठकीमध्ये प्राधान्याने आढावा घेऊन कामात सुधारणा करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: