अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाकरिता डी.टी.पी. प्रशिक्षणाचे
आयोजन
हिंगोली, दि. 16 :
स्थानिक कळमनुरी येथे ओ.टी.एस.पी. अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता
ओ. टी. एस. पी. योजनेअंतर्गत संगणक डी. टी. पी. वर आधारित 1 महिना कालावधीचे
प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर
कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,
हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार
प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात संगणक बद्दल माहिती, कोरल
ड्रॉ, पेजमेकर, वर्ड, एक्सेल, फोटोशॉप, नेटवर्किंग इत्यादी विषयी या प्रकारचे अनेक
तांत्रिक प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची
कार्यप्रणाली, आदीबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या
प्रशिक्षण कार्यक्रमात महिला व युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18
ते 45, शिक्षण 7 वी पास, शिक्षण सुरू नसावे. नॅशनल बँकेचे पासबुक झेरॉक्स आवश्यक
आहे. प्रवेशाची अंतिम तारीख 19 ऑगस्ट, 2017 च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम
आयोजक समाधान मोरे मो. 9158272909 एमसीईडी व्दारा पंचायत समिती कार्यालय, सभागृह
हॉल कळमनुरी ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा
या कार्यक्रमाच्या मुलाखती दि. 22 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 12.00 वाजता पंचायत
समिती कार्यालय, सभागृह हॉल येथे आयोजित करण्यात येणार आहेत. असे आवाहन जिल्हा
उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प
अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment