वस्तू व
सेवाकर कार्यशाळा संपन्न
हिंगोली, दि. 1 : वस्तू व सेवाकर कायद्यातंर्गत शासकीय कार्यालय देखील येत असल्याने
वस्तू व सेवाकर कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे करावी याकरीता वस्तू व सेवाकर
विभागामार्फत शासकीय विभागाकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी
कार्यालयातील डीपीसी सभागृहात करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी,
जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, सहाय्यक राज्य कर आयुक्त निलेश शेवाळकर, प्रकल्प
अधिकारी विशाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहाय्यक राज्य कर
आयुक्त निलेश शेवाळकर म्हणाले की, 1 जुलै, 2017 पासून संपुर्ण देशात वस्तू व
सेवाकर कायदा लागु झाला आहे. देशातील अप्रत्यक्ष कर प्रणाली मध्ये अमुलाग्र बदल
करणारी ही वस्तू व सेवा कर प्रणाली आहे. सदर कर प्रणाली ही राष्ट्रीय सकल
उत्पन्नात वृध्दी करणारी आहे. शासकीय कार्यालयाना देखील वस्तू व सेवाकर कायदा लागु
करण्यात आला असून सर्व शासनाच्या विभाग प्रमुखाची यात महत्वाची भूमिका राहणार आहे.
याकरीता सर्व विभाग प्रमुखांनी वस्तू व सेवाकर कायद्याबाबत सविस्तर माहिती घेवूनच
कार्यालयातील आर्थिक कामकाज करावे. याबाबत काही समस्या असल्यास वस्तू व सेवाकर
कार्यालयाशी संपर्क साधावा.
वस्तू व सेवाकर
पध्दतीबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्याबाबतच्या शंकाचे निरसन करण्यासाठी वस्तू व
सेवा कर विभागाने राज्यात अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच नोंदणी,
विवरणपत्र दाखल करणे इत्यादी बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी वस्तू व सेवाकर
विभागाने सर्व कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारले असल्याचे निलेश शेवाळकर यावेळी म्हणाले
यावेळी शासकीय विभागातील
अधिकारी-कर्मचारी यांची कार्यशाळेस उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment