ग्रामीण डाक सेवक पदासाठी
मुदतवाढ
हिंगोली, दि. 2 : ग्रामीण डाक सेवक पदासाठी ज्या उमेदवारांनी एप्रिल 2017 ते मे 2017
या कालावधीत झालेल्या ग्रामीण डाक सेवक पदाच्या भरती प्रक्रीयेमध्ये ऑनलाईन नोंदणी
केलेली आहे. परंतू काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज सादर करू शकले नाहीत अशा
उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
ज्या उमेदवारांनी भरती
प्रक्रियेत नोंदणी केली आहे परंतू अर्ज दाखल केले नाहीत अशा उमेदवारांनी दि. 07 ते
12 ऑगस्ट, 2017 या कालावधीत http//indiapost.gov.in / http//appost.in/gdsonline
या पोर्टलवर सादर करावेत. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद
घ्यावी, असे अधिक्षक कार्यालय, परभणीचे डाक अधिक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
*****
No comments:
Post a Comment