पोळा व कर सणानिमित्त वसमत ते
औंढा वाहतुक मार्गात बदल
हिंगोली, दि. 18 :
जिल्ह्यात प्रथे व परंपरे प्रमाणे दि. 21 ऑगस्ट, 2017 रोजी पोळा हा सण साजरा
करण्यात येणार असून दि. 22 ऑगस्ट, 2017 रोजी कर सण साजरा करण्यात येणार आहे. सदर कर
सणानिमित्ताने पोलीस स्टेशन कुरंदा हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदीरास हिंगोली,
लातुर, परभणी व नांदेड जिल्हयातील जवळपास 50 हजार ते 60 हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षिणा
घालण्यासाठी त्यांचे मालक घेऊन येतात. त्यामुळे वसमत औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी
आणणाऱ्या लोकांची बरीच गर्दी होते व सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने सदर रोडवर
वाहतुक मोठ्या प्रमाणात चालु असते. सदर दिवशी वाहतुक चालु राहिल्यास अपघात होऊन कायदा
व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसमत टी पाँईट ते नागेशवाडी
पर्यंत रहदारीचा रस्ता हा दि. 22 ऑगस्ट, 2017 रोजी रात्रीचे 00.00 ते दि. 22 ऑगस्ट,
2017 रोजी रात्रीचे 24.00 वाजेपावेतो बंद करण्यात येणार आहे. व नांदेडकडुन येणारी वाहतुक
वसमत मार्गे झिरो फाटा ते हट्टा जवळा बाजार मार्गे नागेशवाडी अशा पर्यायी मार्गाने
औंरंगाबादकडे व औंरगाबादकडुन नांदेडकडे जाणारी वाहने नागेशवाडी मार्गे जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत
ते नांदेडकडे वळविण्यात येत आहे, असे वाहतुक मार्गात बदलाचे आदेश जिल्हादंडाधिकारी
अनिल भंडारी यांनी जारी केले आहेत.
*****
No comments:
Post a Comment