18 August, 2017

अतिवृष्टीचा इशारा !
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 18 : प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्र, पुणे यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दि. 19 व 20 ऑगस्ट, 2017 रोजी बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत:ची तसेच जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी / नागरीक यांना पुढील खबरदारी घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी तसेच विशेषतः शेतकऱ्यांनी विजांचा कडकडाट होत असताना शेतीचे काम करू नये, आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे व स्वतः सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा.
पालकांनी तसेच शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जलसाठ्याजवळ जाऊ देऊ नये तसेच नागरिकांनी जलसाठ्याजवळ पोहण्यासाठी जाऊ नये. तसेच पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
नदी काठच्या गावातील नागरीकांनी सावधगिरी बाळगावी. नदी, ओढा, नाला वाहत असल्यास  ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पुर परिस्थिती निर्माण होणार असे लक्षात येताच तात्काळ प्रशासनास कळवावे.

*****

No comments: