15 August, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांची ‘लोकराज्य’ स्टॉलला भेट
हिंगोली, दि.15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे  मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लोकराज्य मासिकाचा स्टॉलला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी भेट दिली.
लोकराज्य मासिकात ग्रामपंचायत ते मंत्रालय येथील कारभाराची माहिती प्रतिबिंबीत करण्यात येते. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शासनाची माहिती पोहचविणारे राज्य शासनाचे मुखपत्र असलेले हे एकमेव मासिक असल्याचेही पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी देखील लोकराज्य स्टॉल ला भेट दिली.
यावेळी पालकमंत्री यांच्यासह इतर मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला भेट दिली.
****



No comments: