जिल्ह्यात नवीन 61 सजांची
निर्मिती
हिंगोली, दि.23: जिल्ह्यात महसूल प्रशासनातील क्षेत्रीय
यंत्रणेतील महसूल सजांची पुनर्रचना, नवीन सजा निर्मिती करण्यात येणार असून, जिल्ह्यात
61 नवीन तलाठी सज्जे निर्माण होणार आहेत. महसूल सजांची पुनर्रचना, नवीन सजा निर्मिती
व तलाठीची होणारी वाढ यामुळे महसूल विभागात कामकाज वेगाने होण्यास मदत होणार आहे.
या नव्या सजांच्या
पुनर्रचना व नवीन सजा निर्मिती करण्यात येणार असल्यामुळे तलाठ्याकडील अतिरिक्त कार्यभार
कमी होऊन कामाकाजाला गती प्राप्त होण्यास मदत होणार आहे. याकरीता जिल्हाधिकारी अनिल
भंडारी यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 4 अन्वये
प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली असून ही अधिसूचना जिल्हाधिकारी
कार्यालयातील महसूल शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात सुट्टीचे दिवस
वगळून 31 ऑगस्ट, 2017 पर्यंत शासकीय वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. अधिसूचनेबाबत
कोणत्याही प्रकारच्या हरकती, सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात 31 ऑगस्ट, 2017 पर्यंत
संबंधित तहसील कार्यालयात दाखल कराव्या लागणार आहे. उशीरा दाखल केलेल्या हरकती व सूचना
विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment