19 August, 2017

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष
 श्री. किशोर तिवारी यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
            हिंगोली, दि. 19 : कै. वसंतराव नाईक शेती मिशनचे अध्यक्ष मा. ना. श्री. किशोर तिवारी हे दिनांक 22 व 23 ऑगस्ट, 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे.
दिनांक 22 ऑगस्ट, 2017 रोजी दुपारी 1.00 वाजता वाशिम वरून हिंगोली करिता रवाना. दुपारी 2.30 वाजता हिंगोली येथे आगमन. दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी हिंगोली यांचे सोबत जिल्हा आढावा बैठक.
कै. वसंतराव नाईक शेती मिशनचे अध्यक्ष मा. श्री. किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 22 ऑगस्ट, 2017 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजित केलेल्या जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती. याबैठकीत खरीप हंगाम 2017-18 करिता पीक कर्ज, पीक पध्दती, पीक पेरणी, मागील वर्षी झालेले पीककर्ज व वसुली, लागवडी खर्च नियंत्रण, शासकीय धान्य, आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा, मुद्रा, पीककर्ज माफी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंचन प्रकल्प, पशु संवर्धन, महात्मा फुले जन आरोग्य योजना, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, दारुबंदी, रोजगार निर्मिती, शिक्षण, ग्रामीण रोजगार, कृषी रोजगार योजनांचा देण्यात आलेला लाभ, सिंचन, विजवितरण, शेतकरी आत्महत्या, इतर जोडधंद्यासाठी सरकारकडून असलेल्या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती व कायदा, वनविभागामार्फत निर्माण करण्यात आलेले रोजगार, ग्रामीण भागातील कायदा व समस्या, पेसा कायद्याअंतर्गत गावातील वनउपज व्यवस्थापन, इत्यादी विषयांचा आढावा घेण्यात येईल. या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक तसेच वरील विषयांशी संबंधित सर्व जिल्हास्तरीय अधिकारी व मिशनसी संबंधित असलेले सर्व अधिकारी यांनी अद्यावत माहितीसह स्वत: उपस्थित राहणे गरजेचे आहे प्रतिनिधी पाठवू नये.
बैठकीनंतर सायंकाळी शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथील सभागृहात सायंकाळी दुष्काळावर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. रात्री हिंगोली येथे मुक्काम.

*****  

No comments: