रेशीम कृषी प्रदर्शनी मध्ये स्टॉल लावण्याची सुवर्णसंधी
हिंगोली,
दि.20 : रेशीम संचालनालय, सहकार,
पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे मार्फत रेशीम दिन 2019 साजरा करण्याचे
योजिले आहे.सदर कार्यक्रम दिनांक 01 सप्टेंबर ,2019 रोजी
जालना येथे आयोजित करण्यात
येणार आहे. सदर कार्यक्रमाचे स्थळी रेशीम संचालनालय, म.रा. यांचे तर्फे दिनांक
30 ऑगस्ट ते 01 सष्टेंबर रोजी रेशीम कृषी प्रदर्शनी आयोतिज करण्यात आली आहे.
सदर प्रदर्शनी भव्य स्वरुपाची असुन संपुर्ण राज्यातुन
रेशीम शेतकरी तसेच रेशीम व कृषी विषयाशी संबधित तज्ञ मोठया संख्येने हजर राहणार आहेत.
सदर प्रदर्शनी मध्ये आपल्या उत्पादनाची जाहिरात व विक्री करणे करिता स्टॉल लावण्याची
सुवर्णसंधी उपलब्ध करुन देत आहे, जर आपण रेशीम साहित्य निर्मीती करणारे, कृषी कंपन्या,
विमा कंपन्या, खाद्य पदार्थ विक्री करणारे, रेशीम व कृषीसाठी उपयुक्त साहित्य निर्मीती
करणारे उत्पादक व विविध बचत गट इत्यादी आहात तर आपन आपल्या उत्पादनाची मोठया प्रमाणात
जाहिरात व विक्री करणे करिता प्रदर्शनी स्थळी स्टॉल लावावे. स्टॉलचे आरक्षण प्रथम
आगमन - प्रथम प्राधान्य स्तरावर करण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्ती / कंपनी
/ बचत गट / संस्था / शासकीय- निम-शासकीय कार्यालये / विद्यापीठ / कृषी विज्ञान केंद्र
/ शासकीय संस्था यांनी दिनांक 26 ऑगस्ट, 2019 पर्यंत आपली
नोंदणी करावी. स्टॉल नोंदणी तसेच
अधिक माहिती व संपर्कासाठी रेशीम संचालनालय,महाराष्ट्र
राज्य,6 वा माळा,नवीन प्रशासकीय ईमारत क्रं.2,विभागीय आयुक्त कार्यालय परिसर,सिव्हील
लाईन्स,नागपुर-440001 फोन नं.0712-2569924 / 2569926 ई.मेल-dos.maha@gmail.com, सहाय्यक
संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय,प्लॉट क्रं.54, सदाशिव नगर, धुत हॉस्पिटल समोर,सिडको
एन-2,औरंगाबाद.- 4031003 फोन नं.0240-2475747 मो.क्र.9420191067 ई.मेल-adsilkaurangabad@gmail.com,
रेशीम विकास अधिकारी श्रेणी-2 , जिल्हा रेशीम कार्यालय,कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर,कापुस
प्रयोगशाळा इमारत, जालना.-431203 फोन नं.02482-229047 मो.क्र.9850447096 ईमेल-reshimjalna@gmail.com
येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment