माजी सैनिक/ विधवा यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती / विद्यावेतन
योजना
हिंगोली,दि.2: महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण
विभागामार्फत सन 2019 मध्ये इयत्ता 10/12
व पदवी परीक्षेत किमान 60 % गुण
प्राप्त करुन पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी
सैनिकांच्या /विधवांच्या पाल्यासाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती
योजना राबविण्यात येणार आहे. तरी ज्या माजी सैनिक/ विधवांच्या पाल्यांनी इयत्ता
10/12 मध्ये 60 % गुण प्राप्त केले आहेत त्यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2019
पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे खालील कागदपत्रांसह अर्ज सादर
करावेत- इयत्ता 10/12 व पदवी गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असलेल्या
इयत्तेचे बोनाफाईड सर्टीफिकेट, केंद्र / राज्य शासनाची/ इतर शिष्यवृत्ती मिळत
नसल्याचा शाळा/महाविद्यालयाचा/ संस्थेचा प्राचार्याया दाखला, ज्या पाल्यांनी
CET/JEE किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन
शैक्षणिक वर्षे 2019-20 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा पाल्यांना
प्रकरणासोबत Gap Certificate (स्वयंघोषणापत्र ) घेऊन शिष्यवृत्तीची मंजुरी
द्यावी, माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिसचार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे
असलेल्या पानाची किंवा राशन कार्डची छायांकित प्रत, मुलीचे वय 18 पेक्षा जास्त
असल्यास मुलगी अविवाहीत असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, आर्थिक मदतीच्या पिवळ्या
कार्डची छायांकित प्रत (दोन्ही बाजू) राष्ट्रीयीकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची
छायांकित प्रत, आधार कार्ड आवश्यक आहे.
***
No comments:
Post a Comment