31 ऑगस्ट 2019 रोजी महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या
नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ
हिंगोली,दि.29: येथील महिला व आर्थिक विकास महामंडळ यांच्या लिंबाळा मक्ता येथे
बांधण्यात आलेल्या नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी
10 ते 10.30 वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या
अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे तर अध्यक्ष श्रीमती शिवराणीताई नरवाडे, अध्यक्षा
जिल्हा परिषद, हिंगोली तर हिंगोली लोकसभा
मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख
पाहुणे म्हणून आमदार सर्वश्री रामराव वडकुते,विप्लव बाजोरीया, विक्रम काळे, सतीष
चव्हाण, जयप्रकाश मुंदडा, तानाजी मुटकुळे, संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर,
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य
कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, उपाध्यक्ष
तथा व्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळ श्रीमती श्रध्दा जोशी उपस्थित
राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमामध्ये सकाळी 10.30 ते 11.30 वाजे दरम्यान मानव विकास मिशन कार्यक्रम सन
2018-19 अंतर्गत गाव समिती मधील महिलांना कृषी औजार बँकेचे वाटप व मान्यवरांचे
मार्गदर्शन, दुपारी 1 ते 3.00 वाजे दरम्यान नारी सन्मान सोहळा – उत्कृष्ट उद्योजक
महिला व बचत गटांचा सत्कार, बंजारा महिला बचत गटांचा सांस्कृतिक कार्यक्रम (स्थळ :
रामलीला मैदान, हिंगोली) या महिला मेळाव्याकरिता बचत गटातील 8 हजार महिला उपस्थित
राहणार आहेत. तसेच महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे निवडक स्टॉल लावण्यात येणार
आहेत.
00000
No comments:
Post a Comment