02 August, 2019

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार योजना


विविध क्षेत्रात  अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य
यांना विशेष गौरव पुरस्कार योजना

हिंगोली,दि.2:सर्व माजी सैनिक/ विधवा यांना कळविण्यात येते की, हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  पातळीवर विविध क्षेत्रात  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या (खेळात/ साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला / नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी/ यशस्वी उद्योजक / सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारे ) माजी सैनिक/ पत्नी/ पाल्य तसेय शैक्षणिक  वर्षे 2018-19 मध्ये इ. 10 वी व ई. 12 वी बोर्डोत 95 %  पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या  माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष  गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, पत्नी पाल्यांनी या कार्यालयात उपलब्ध असलेले कागदपत्रांसाठी दिनांक 16 सप्टेंबर 2019 पूर्वी या कार्यालयात संपर्क साधावा व येताना सोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, 10 वी /12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत , चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात  कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयीकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित  प्रत, तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे  प्रमाणपत्र, या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष , हिंगोली यांनी केले आहे.
***

No comments: