पालकमंत्री अतुल सावे यांची ‘लोकराज्य’ स्टॉलला भेट
हिंगोली, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत प्रकाशित
करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र
असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन
दिन कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लोकराज्य मासिकाचा स्टॉलला राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे
राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी भेट दिली.
लोकराज्य मासिकात
ग्रामपंचायत ते मंत्रालय येथील कारभाराची माहिती प्रतिबिंबीत करण्यात येते. तसेच महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यात शासनाची माहिती पोहचविणारे राज्य शासनाचे मुखपत्र असलेले हे एकमेव मासिक
असल्याचेही पालकमंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले.
यावेळी खासदार
हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी देखील लोकराज्य स्टॉल
ला भेट दिली.
यावेळी पालकमंत्री
यांच्यासह इतर मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या
स्टॉलला भेट दिली.
*****
No comments:
Post a Comment