वयोश्री योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम सहाय्यभूत
अवयव साधनांसाठी नांव नोंदणी तपासणी शिबीराचा शुभारंभ
हिंगोली, दि.02: सामाजिक न्याय एवंम अधिकारीता मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम
निर्माण निगम (एलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन हिंगोली, जिल्हा अपंग पुर्नवसन
केंद्र हिंगोली व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील 60
व 60 वर्षापूढील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासनाच्या वयोश्री योजनेतंर्गत
आवश्यकतेनुसार लागणाऱ्या साहाय्यभूत साधानाचे मोफत वाटप करण्यासाठी नांव नोंदणी व
मोजमाप/तपासणी शिबीराचे जिल्ह्यातील तालूकानिहाय आयोजन करण्यात आले असून हिंगोली
येथील जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज येथे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या
हस्ते आज या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश
टेहरे, निवासी वैद्यकीय
अधिकारी डॉ. गोपाल कदम जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर
यांची प्रमुख उपस्थिती होती.
या तपासणी शिबीरामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्हिलचेअर,
श्रवण यंत्र, कुबडी, सर्व प्रकारच्या काठ्या (वॉकींग स्टीक), वॉकर, रोलेटर्स,
डोळ्याचे चष्मे, दाताची कवळी इत्यादी वस्तूच्या साहित्याचे वितरण करण्यात येणारअ
आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालूक्यात या पूर्व तपासणी नोंदणी शिबीराचे आयोजन
करण्यात आले असून यामध्ये शनिवार दि. 03 ऑगस्ट, 2019 रोजी उप जिल्हा रुग्णालय, वसमत, जि.
हिंगोली, रवीवार दि. 04 ऑगस्ट, 2019 रोजी ग्रमीण रुग्णालय, औंढा, जि. हिंगोली,
सोमवार दि. 05 ऑगस्ट, 2019 रोजी ग्रामीण रुग्णालय, सेनगाव, जि. हिंगोली आणि
मंगळवार दि. 06 ऑगस्ट, 2019 रोजी उप जिल्हा रुग्णालय, कळमनुरी, जि. हिंगोली
याठिकाणी सकाळी 10 ते 4 या वेळेत आयोजित करण्यात आले असून कालावधीत ज्येष्ठ
नागरिकांनी आपली नांव नोंदणी व तपासणी करुन घ्यावी. लाभार्थ्यांनी येतांना
आधारकार्ड, बीपीएल पेन्शन कार्ड अल्प उत्पन्न गटातील उत्पन्नाचा दाखला सोबत आणावा.
या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अपंग पुनवर्संन
केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय संबंधीत तालूक्यातील गट विकास अधिकारी यांच्याकडे
संपर्क साधावा.
****
No comments:
Post a Comment