02 August, 2019

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व अधिनियमाची अंमजबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांत कालानुरुप सुधारणा करण्याबाबतचे जाहीर निवेदन


महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व अधिनियमाची अंमजबजावणी करण्यासाठी
तयार करण्यात आलेल्या नियमांत कालानुरुप सुधारणा करण्याबाबतचे जाहीर निवेदन

हिंगोली,दि.2:महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियम 1) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता) नियम 2) 1970 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये संघ(सहायक अनुदानासाठी मान्यता देणे )  नियम 1971 3) महाराष्ट्र  सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपध्दती ) नियम 1972 4) महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परिसंस्थाची ग्रंथालय) सहायक  अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम 1974 यामध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
या संदर्भात याद्वारे ग्रंथालय चळवळीशी संबंधित लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवक, वाचक व सभासद, शैक्षणिक ग्रंथपाल, ग्रंथालय व्यावसायिक , संस्था, लोकप्रतिनिधी, महिला , महाविद्यालय , विद्यापीठीय ग्रंथालय व माहितीशास्त्राचे प्राध्यापक, संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग इ. संबंधित सर्वांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी प्रस्तावित  अधिनियम व नियमांत सुधारणा / बदल सुचविताना  त्याचे बाब निहाय सकारण व योग्य समर्थन करणे आवश्यक आहे. तसेच सुधारणा / अभिप्राय/मत/ सूचना इ. विषयक पत्रव्यवहार समक्ष/ टपाल/ ई- मेलद्वारे ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावा.
याबाबतचा संपूर्ण तपशील ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिला आहे.
***



No comments: