शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी
समान निधी योजनेसाठी
अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,
दि.31 : ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या
मार्फत राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक
कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण, कोलकाता त महाराष्ट्र राज्य
मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने समान निधी योजनेतंर्गत इमारत बांधकाम , व ईमारत
विस्तार व नुतनीकरण या योजनेसाठी तब्बल 10 लाख रुपयाचा निधी दिला आहे.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालया मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य
देण्यात येते. त्या संदर्भातील नियम ,अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठाणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी
इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध किंवा Download करुन घ्यावा. समान निधी योजना
(Maching Schemes) 2018-19 साठी , राज्य शासनाच्या 50% प्रतिष्ठाणच्या 50% अर्थसहाय्य सार्वजनिक ग्रंथालयांना
इमारत बांधकाम / विस्तार व नुतनीकरण अर्थसहाय्य कमाल मर्यादा 10 लाख रूपये मर्यांदित
निधीची उपलब्धता होऊ शकते. या योजनांसाठी करावयाचा अर्जासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय
प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी
संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in संकेतस्थळ पहावे.
ग्रंथालयांनी समान निधी योजनेतंर्गत इमारत बांधकाम, विस्तार व नुतणीकरणासाठीचा प्रस्ताव
विहित नमुन्यात पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागतपत्रासह इंग्रजी,हिंदी भाषेत चार प्रतीत
संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि.16 सप्टेंबर 2019 पर्यंत पोहचतील अशा
बेताने पाठवावेत. असे अवाहन सुभाष हि.राठोड, प्र.ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय,
नगर भवन, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मि.गो.सोनकांबळे हिंगोली यांनी सर्व शासनमान्य
सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
000000
No comments:
Post a Comment