07 August, 2019

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम व नियम सुधारणा समितीची 11 ऑगस्ट रोजी बैठक


महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम व नियम
सुधारणा समितीची 11 ऑगस्ट रोजी बैठक

हिंगोली,दि.7: महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी समितीची विभागवार बैठक रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2019 रोजी औरंगापुरा येथील बलवंत वाचनालयाच्या स्व.विजयेंद्र काबरा स्मृती सभागृहामध्ये सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सार्वजनीक ग्रंथालये अधिनियम 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियम पुढील प्रमाणे असून यात 1) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता) नियम 1970, 2) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये संघ(सहायक अनुदानासाठी मान्यता देणे.  नियम 1971, 3) महाराष्ट्र  सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपध्दती. नियम 1972 आणि 4) महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परिसंस्थाची ग्रंथालय) सहायक  अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम 1974 यामध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून यासाठी ग्रंथालय संचालक सु.ही. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सुधारणा समिती गठीत केली आहे.
या बैठकीसाठी औरंगाबाद विभागातील शासनामान्य जिल्हा व तालुका ग्रंथालयांचे अध्यक्ष, कार्यवाह, ग्रंथपाल, सर्व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, कार्यवाह, ग्रंथ/ग्रंथालय चळवळीशी संबंधित स्थानिक लेखक, साहित्यीक, वृत्तपत्र संपादक, प्रतिनिधी, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, वाचक व सभासद, विद्यापीठ, महाविद्यालयीन शालेय ग्रंथपाल, प्राध्यापक, ग्रंथालय संचालनालयातील माजी अधिकारी इत्यादीनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुनील हुसे, समिती सदस्य तथा सहायक ग्रंथालय संचालक, औरंगाबाद यांनी केले आहे.

****

No comments: