पूरग्रस्तांच्या मदतीकरीता वर्गणी जमा करण्यासाठी मंडळानी
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी
हिंगोली,दि.22: सांगली, कोल्हापूर, सातारा व इतर जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे बाधित पूरग्रस्तांच्या
मदतीकरीता वर्गणी गोळा करणेकामी
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये विहित नमुन्यात
पूर्वसूचना , अर्ज धर्मादाय उप आयुक्त, सहायक धर्मादाय आयुक्त यांनी सादर करण्याची
मुभा आहे. अशा मंडळांना संस्थांनी
धर्मादाय उप आयुक्त यांनी चौकशी केल्यानंतर अटी, शर्तींना अधीन राहून दाखला
देण्यात येईल, सदर नमूद कारणाकरिता गोळा केलेल्या वस्तू किंवा रकमेची योग्य
विल्हेवाट लावण्याकरिता व गरजूंना ती मदत मिळण्याकरिता सर्व मंडळांनी त्या वस्तू व
रकमेचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अथवा
त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने किंवा निरीक्षणाखाली करणे
योग्य होईल.
संबंधित मंडळांनी माहिती, पूर्वसूचना देताना सर्व सदस्यांच्या सहीचा ठराव
असावा(हस्तलिखित) प्रत, पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड इत्याची ओळखपत्रांची
प्रत सोबत जोडावी .
संबंधित मंडळाकडून सूचना प्राप्त झाल्यास त्यांना 15 दिवसांच्या आत दाखला
देण्यात येईल. परंतू मदत किंवा रक्कम गोळा करण्यासमध्ये काही फसवणूक वा अपव्यय
झाला असे समजण्यास कारण असल्यास धर्मादाय उप आयुक्त व सहायक धर्मादाय आयुक्त
त्यांनी तशी मदत किंवा रक्कम गोळा न करण्याचे आदेश देतील आणि हिशोब पत्रके सादर
करून उर्वरित रक्कम पी.टी.ए. फंडामध्ये जमा करण्याचे आदेशित करतील. असे धर्मादाय
आयुक्त, मुंबई यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment