स्वच्छ
भारत मिशन(ग्रा.) अंतर्गत हागणदारी मुक्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
हिंगोली,दि.7: स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) अंतर्गत हागणदारी
मुक्त टप्पा दोन पडताळणी (ODF-2) जिल्हास्तरीय कार्यशाळा आज दिनांक ७आगस्ट 2019
रोजी घेण्यात आली.व श्री. गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे जिल्हा
परिषदेच्या मा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन(ग्रा) अंतर्गत हागणदारी मुक्त टप्पा दोन पडताळणी
(ODF-2) साठी काम सुरू होत असून,पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी
अधिकारी एस.व्ही.गोरे यांनी टप्पा दोनचे काम लवकर तसेच चांगले होण्यासाठी प्रयत्न
करत आहे.या कार्यशाळेत राजेंद्र सरकटे यांनी ODF-2 चा उद्देश व प्रस्तावना समजावून
सांगितली.
ODF पडताळणी टप्पा 2 करिता प्रत्यक्ष करावयाची अंमलबजावणी
प्रक्रियेबाबत वासो मुंबई चे विभागीय समन्वयक अरूण रसाळ यांनी उपस्थितांना
मार्गदर्शन केले. त्यामध्ये अंमलबजावणी साठीच्या Apps वरील नोंदी व प्रपत्र माहिती
संकलन प्रक्रिया बाबतही त्यानी माहिती दिली.तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता
अभियान सन 2019-20 मध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी व शासननिर्णय मध्ये झालेले बदला
बाबत यांनी सविस्तर माहिती दिली.त्याचप्रमाणे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
अंमलबजावणी,पाणी गुणवत्ता व जैविक तपासणी,स्वच्छता सर्वेक्षण व तद्नंतर
राष्ट्रपिता महात्मा गांधी 150 वी जयंती निमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध
उपक्रमाविषयी यांनी मार्गदर्शन केले व
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा घेण्यात आला.केले.तर ODF 2 बाबत चर्चा व
समारोप राजेंद्र सरकटे यांनी केले.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व विभागाचे
विस्तार अधिकारी,BRC/CRC, ग्रामलेखा व पाणी गुणवत्ता सल्लागार व जिल्हा कक्षातील
तज्ञ,सल्लागार आदी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment