सार्वजनिक न्यास
नोंदणी कार्यालयात मंडळाना नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.22: महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41 सी
अन्वये सर्व मंडळांना विहित नमुन्यात संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्षरित्या संबंधित
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी
करणे अनिवार्य आहे. सदरचा अर्ज सर्व मंडळांना charity.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर करता येईल. संकेतस्थळावर सादर केलेल्या अर्जाचा निपटारा नियमानुसार
सात दिवसात करण्यात येईल. प्रत्यक्ष सादर केलेला अर्ज प्राप्त झाल्यानंतर 15
दिवसांच्या आत निकाली काढण्यात येईल. सदर
तरतुदीअंतर्गत देण्यात येणारे दाखले सहा महिन्यांकरीता वैध असतील. सदर कालावधीनंतर
असे दाखले नुतनीकरण करण्यास ग्राह्य नसतील. सर्व गणेशोत्सव मंडळांना सदरचा दाखला
प्राप्त झाल्यापासून त्या कालावधीनंतर दोन
महिन्यांच्या आत सदर कार्यालयात लेखा
परीक्षण अहवाल सादर करणे व उर्वरित रक्कम
जमा करणे अनिवार्य आहे. गणेशोत्सव मंडळाने वरील तरतुदीप्रमाणे परवानगी न घेतल्यास
कलम 66-सी प्रमाणे तीन महिन्यांपर्यंत कैद किंवा परवानगी प्राप्त करण्यापूर्वी
गोळा केलेल्या एकूण वर्गणीच्या दीड पटपर्यंत दंडाची तरतुद केली आहे. तरी सर्व
मंडळांना भविष्यात होणारा अनर्थ टाळण्याकरिता कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्याचे
आवाहन धर्मादाय आयुक्त, मुंबई यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment