08 August, 2019

पीक कर्ज व तक्रार निवारणासाठी तालूकास्तरीय शिबीराचे आयोजन



पीक कर्ज व तक्रार निवारणासाठी तालूकास्तरीय शिबीराचे आयोजन

हिंगोली, दि. 8 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामागरीता पिक कर्ज वाटपाची कार्यवाही सुरू आहे. याकरीता जिल्ह्यातील सर्व तालूक्यातील तहसिल कार्यालयात मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पिक कर्ज वाटप व तक्रारीचे निवारण करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. शिबीरात सहाय्यक निबंधक, बँक कर्मचारी यांनी उपस्थित राहून शेतकरी बांधवांना पीक कर्ज वितरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.
या सूचने नुसार जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात मंगळवार (दि.6) रोजी शिबीराचे यशस्वी आयोजन करुन   शेतकऱ्यांना कर्जवाटप करुन तक्रारींचे निवारण केले. यावेळी पाचही तालूक्यातील शेतकरी बांधवांनी या शिबीरास उपस्थित राहून आपल्या तक्रारीचे निवारण करुन घेतले. सर्व संबंधित तहसिलदारांनी शिबीराचे योग्य नियोजन केल्याने शेतकरी बांधवांच्या कर्ज वितरण व तक्रारींचे निवारण होण्यास मदत झाली होती..
पीक कर्जासाठी मंगळवार व शुक्रवार या दिवशी शिबीराचे आयोजन करुन शेतकऱ्यांचे कर्जवाटप व तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घेवून आपल्या कर्जवाटप व तक्रारींचे निवारण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****


No comments: