पालकमंत्री अतुल सावे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.28: उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून,
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री श्री. सावे यांचे बुधवार
दिनांक 28 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 8.00
वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
तसेच गुरुवार
दिनांक 29 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता हिंगोली विश्रामगृह येथून जवळा
बाजारकडे प्रयाण, सकाळी 8.30 वाजता जवळा बाजार येथे सभा स्थळ पाहणी, सकाळी 10.00
वाजता औंढा नागनाथ येथील सभा स्थळी पाहणी, सकाळी 11.00 वाजता विभागीय वन अधिकारी
कार्यालय, हिंगोली नूतन इमारतीच्या
उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : विभागीय वन अधिकारी कार्यालय, नांदेड रोड,
हिंगोली), दुपारी 12.00 वाजता कळमनुरी येथील सभा स्थळ पाहणी, दुपारी 2.00 वाजता
शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव, दुपारी 3.30 वाजता विविध शासकीय
विभागांची आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली), दुपारी 5.00 वाजता
रामलिला मैदान, हिंगोली येथे सभा स्थळ पाहणी, सोईनुसार शासकीय विश्रामगृह येथे
आगमन व राखीव.
शुक्रवार दिनांक
30 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 8.30 वाजता हिंगोली विश्रामगृह येथून झिरोफाटाकडे
प्रयाण, सकाळी 11.40 वाजता जवळा बाजार येथेआगमन व मुख्यमंत्री यांच्या सभेस
उपस्थिती (स्थळ : मार्केट कमिटी मैदान),
दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री यांच्या सभेस उपस्थिती (स्थळ : रामलीला
मैदान), दुपारी 3.45 वाजता कळमनुरी येथून आखाडा बाळापूर, नांदेडकडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment