डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन
योजनेतंर्गत विविध घटकासाठी अर्जाची मागणी
हिंगोली, दि.23 : सन 2019-20 मध्ये अनुसूचित
जाती/नवबौध्द अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न , उत्पादन वाढीस सहाय्य करुन त्यांच्या उन्नतीसाठी
मदत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवीन
विहिर पॅकेज, जुनी विहिर दुरुस्ती पॅकेज, इनवेल
बोअरींग, वीज जोडणी आकार, शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज, सुक्ष्म सिंचन, पंप
संच या घटकांसाठी अनुदान देय राहील. अधिक माहितीसाठी कृषि अधिकारी (विघयो), पंचायत
समिती यांच्याकडे संपर्क साधावा.
पात्र
लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर सुविधा
दिनांक 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज
www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावा, ऑनलाईन सादर केलेल्या
अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित, छायांकित प्रतींसह अर्जाची
/ परिपूर्ण प्रस्तावाची मुळप्रत शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह कृषि अधिकारी
(विघयो), पंचायत समिती यांच्याकडे स्वहस्ते सादर करावे असे आवाहन अति. मुख्य कार्यकारी
अधिकारी , जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment