30 June, 2020

जिल्ह्यात गत 24 तासात 62.73 मि.मी. पावसाची नोंद

 जिल्ह्यात गत 24 तासात 62.73 मि.मी. पावसाची नोंद

 

हिंगोली,दि.30: जिल्ह्यात दि.30 जून, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 62.73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 12.55 मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 214.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 24.97 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 30 जून, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) हिंगोली-12.86 (208.73) मि.मी., कळमनुरी-19.33 (175.32) मि.मी., सेनगांव-19.00 (262.21) मि.मी., वसमत-6.29 (158.16) मि.मी., औंढा नागनाथ-5.25 (268.75) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 214.43 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 

 


29 June, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या दिवशी होणारी गौकर्ण यात्रा रद्द

सुधारीत वृत्त :

हिंगोली, दि.29: जिल्ह्यातील गौकर्ण येथे दि. 1 जुलै, 2020 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गोकर्णा माळावरील मंदीरावर यात्रा भरणार असून त्या ठिकाणी जाण्यासाठी वगरवाडी, नागेशवाडी, दरेगाव, औंढा नागनाथ, जिंतूर फाटा येथून भाविक पायी जातात व मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी कालावधीत या सर्व उत्सवात मोठ्या प्रमाणात महिला पुरुष, अबाल, वृध्द, भाविक येत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर आजारावर अद्यापपर्यंत कुठलाही प्रतिबंधक उपाय किंवा लस उपलब्ध झाली नसल्याने गौकर्ण येथील यात्रेस जमणाऱ्या भाविकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, तसेच साथ रोगाचा फैलाव होऊ नये याकरीता उत्सवात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना, भाविकांना प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. तसेच या पुढील कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविक जमा होणारे धार्मिक कार्यक्रम मेळावे, यात्रा, महोत्सव साजरा करण्यास जनहितार्थ प्रतिबंध करणे अत्यावश्यक आहे.

जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जिवीत हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये गौकर्ण येथील दि. 1 जुलै, 2020 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी होणारी यात्रा रद्द करीत असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****

 


कन्हेरगांव नाका कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त

कन्हेरगांव नाका कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त

 

हिंगोली,दि.29: हिंगोली तालुक्यातील मौ. कन्हेरगांव नाका येथील वार्ड क्र. 2 येथे कोविड-19 चा रुग्ण आढळून आला होता. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून कन्हेरगांव नाका येथील वार्ड क्र. 2 हे क्षेत्र कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते.परंतू मौ. कन्हेरगांव नाका येथील रुग्ण हा बरा झाला असून कन्हेरगाव नाका येथील वार्ड क्र. 2 हे क्षेत्र वगळता सर्व गांव कंटेन्मेंट झोन मुक्त करणेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात सदर क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.

त्यानुसार मौ. कन्हेरगांव नाका येथील वार्ड क्र.2 चा कंटेनमेंट झोनचा कालावधी संपला असल्याने वार्ड क्र. 2 हे क्षेत्र वगळता इतर परिसरातील व्यक्तीसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेले क्षेत्र प्रतिबंध मुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी  प्रतिबंधमुक्त करण्यात आल्याचे आदेश काढले आहेत.

****


कळमनुरीत पाच दिवस संचारबंदी

कळमनुरीत पाच दिवस संचारबंदी

 

हिंगोली,दि.29: राज्य शासनाने करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 जून , 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार  जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोविड-19 नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मंगळवार दि. 2 जून, 2020 रोजीच्या आदेशान्वये जीवनाश्वयक वस्तुंची तसेच इतर दुकाने दैनंदिन सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत चालू करण्यात आली होती. परंतू कळमनुरी शहरातील काजी मोहल्ला भागात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण सात रुग्ण आढळून आल्याने कळमनुरी  नगर परिषद भाग पूर्णत: बंद करणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कळमनुरी नगर परिषद मधील हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस (व्यक्ती, वाहन) व सर्व आस्थापनास दि. 29 जून ते 3 जुलै, 2020 या कालावधीत बंदी करण्यात येत आहे. त्यानुसार कळमनुरी शहराच्या सर्व सीमा या कालावधीत बंद करण्यात येत असून सदर सीमेमधून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती आत किंवा बाहेर जाण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

संचारबंदी काळात परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारमध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याचे विरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी नगर परिषद, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांची असेल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****

 

 


इजिमा-35 रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात · सार्वजनीक बांधकाम विभागाकडून खुलासा

इजिमा-35 रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात

·   सार्वजनीक बांधकाम विभागाकडून खुलासा

 

हिंगोली,दि.29 : दैनिक सकाळ या वृत्तपत्रात दि. 27 जून, 2020 रोजी ‘पुल वाहून गेला 25 गावांचा वांधा, हिंगोली तालूक्यातील वसईतील घटना मराठवाड्यात पाऊस’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाले आहे. तसेच यामध्ये ‘मृग नक्षत्रातील पावसाने वसई येथील पुलाच्या बाजूची माती खचली होती. त्याकडे सार्वजीनक बांधकाम विभागाने दूर्लक्ष केल्याचे म्हटले आहे’.

परंतू सदर रस्ता औंढा नागनाथ तालुक्यातील रस्ते विकास आराखडा 2001-2021 नुसार इजिमा-35 दर्जाचा असून हा रस्ता प्ररामा-7 वर चिखलवाडी -समगा-धामणी-वसई-पूर-कंजाळा-जामगव्हाण रामा 257 ला मिळणारा आहे. तसेच सदर इजिमा-35 हा रस्ता देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसून कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम) हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे वृत्तपत्रात प्रसध्द बातमीत सदर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद (बांधकाम) हिंगोली यांच्याकडे असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

****

 


औंढा तालुक्यातील भोसी व कळमनुरी तालुक्यातील बाभळी गाव कंटेनमेंट झोन घोषित

औंढा तालुक्यातील भोसी व कळमनुरी तालुक्यातील बाभळी गाव कंटेनमेंट झोन घोषित

 

        हिंगोली,दि.29: औंढानागनाथ तालुक्यातील मौ. भोसी आणि कळमनुरी तालुक्यातील मौ. बाभळी या गावात कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून मौ. भोसी व मौ. बाभळी या गावाचे संपूर्ण क्षेत्र हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

 


जिल्ह्यात गत 24 तासात 23.25 मि.मी. पावसाची नोंद

 जिल्ह्यात गत 24 तासात 23.25 मि.मी. पावसाची नोंद

 

हिंगोली,दि.29: जिल्ह्यात दि. 29 जून, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 23.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4.65 मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 202.09 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 23.51 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 29 जून, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात  (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) हिंगोली-4.29 (195.87) मि.मी., कळमनुरी-1.00 (155.99) मि.मी., सेनगांव-6.50 (243.21) मि.मी., वसमत-2.71 (151.87) मि.मी.,  औंढा नागनाथ-8.75 (263.50) मि.मी., पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आज अखेरपर्यंत सरासरी 202.09 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

****


26 June, 2020

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 28.30 मि.मी. पावसाची नोंद

 

हिंगोली,दि.26: जिल्ह्यात दि. 26 जून, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 141.52 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 28.30 मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 171.89 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 20 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 26 जून, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिली मीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) हिंगोली 38.00 (182.16) मि.मी., वसमत 5.86 (126.59) मि.मी., कळमनुरी 10.83 (135.16) मि.मी., औंढा नागनाथ 44.00 (226.00) मि.मी., सेनगांव 42.83 (189.55) मि.मी. पाऊस झाला आहे. आज अखेर पावसाची सरासरी 171.89 मि.मी. नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

 

 


वसमत येथील कुरेशी मोहल्ला कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त

 

हिंगोली, दि. 26 :- वसमत येथील कुरेशी मोहल्ला येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आले होते.  या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून वसमत नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधील कुरेशी मोहल्ला हे क्षेत्र कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या भागाचे दि. 11 जून, 2020 रोजी सर्वेक्षण करुन 485 घराची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 2492 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये संशयित अथवा कोरोनाची लक्षणे असलेली (सर्दी, ताप व खोकला) व्यक्ती आढळून आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात नमूद करुन हे क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.

*****

 


दाती, डोंगरकडा कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त

हिंगोली, दि. 26 :- कळमनुरी तालुक्यातील दाती, डोंगरकडा-बौध्दवाडा येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आले होते.  या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून दाती, डोंगरकडा-बौध्दवाडा हे क्षेत्र कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या भागाचे दि. 12 जून, 2020 रोजी सर्वेक्षण करण्यात आले होते. यावेळी दाती येथील एकूण 376 घराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1745 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. तसेच डोंगरकडा-बौध्दवाडा येथील 150 घराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 575 व्यक्तीची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये संशयित अथवा कोरोनाची लक्षणे असलेली (सर्दी, ताप व खोकला) व्यक्ती आढळून आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात नमूद करुन हे क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.

वरील घोषित केलेल्या कंटोनमेंट झोनचा कालावधी दि. 25 जून, 2020 रोजी संपल्यामुळे या परिसरातील व्यक्तीसाठी प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी  प्रतिबंधमुक्त केले आहेत.

*****


कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू ; तर 22 जणांवर उपचार सुरु

कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू ; तर 22 जणांवर उपचार सुरु

 

हिंगोली,दि.26: कोरोनामुळे केंद्रा खुर्द येथील एका 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. या रुग्णावर जिल्हा रुग्णालय, वाशिम आयकॉन हॉस्पीटल, अकोला आणि शासकीय वैद्यकीय संस्था, अकोला येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तिला मुधमेहाचा आजार होता. काल तिचा अकोला येथे मृत्यू झाला आहे. तिच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे थ्रोट स्वॅब तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 251 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 229 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज घडीला जिल्ह्यात एकूण 22 बाधीत रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

हिंगोली जिल्ह्यातंर्गत कोविड-19 ची लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमतमध्ये एकूण 2 कोविड-19 रुग्ण (1 बुधवार पेठ, 1 चंदगव्हाण) येथील रहिवासी आहेत. तर  कोरोना केअर सेंटर, कळमनुरी येथे एकूण 10 कोविड-19 रुग्ण (2 काजी मोहल्ला कळमनुरी, 1 टव्हा, 5 कवडा, 2 गुंडलवाडी) येथील रहिवासी आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कळमनुरी येथे तीन कोविड-19 चा रुग्ण (एस.आर. पी. एफ. जवान्‌) उपचारासाठी भरती आहेत. कोरोना केअर सेंटर, लिंबाळा अंतर्गत 5 कोविड-19 चे रुग्ण (1 कन्हेरगाव नाका, 1 संतुकपिंप्री, 1 तालाबकट्टा, 2 रिसाला बाजार) उपचारासाठी भरती आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये एकूण 1 कोविड-19 रुग्ण (1 जवळा बाजार) ज्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. तर कोरोना केअर सेंटर, सेनगाव येथे 1 कोविड-19 चा रुग्ण (कहाकर बुद्रुक) उपचारासाठी भरती आहे.

हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर अंतर्गत एकूण 4,233 व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 3,756 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 3,554 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीला 677 व्यक्ती भरती आहेत. तर आज रोजीपर्यंत 273 अहवाल येणे प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यंत इमरजन्सी असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे, तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित  रुग्ण असल्यास आपणांस सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते.

****

 


कोरोना:मधुमेही, रक्तदाब, ह्दयविकार आदी व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी नोंदणी करावी-- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

कोरोना:मधुमेही, रक्तदाब, ह्दयविकार आदी व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी नोंदणी करावी

-- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

·   आरोग्याची विशेष काळजी घेत संसर्गापासून वाचण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

 

हिंगोली,दि.26: कोरोनाचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढत आहे, या पार्श्वभूमीवर मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार, क्षयरोग, कर्करोग, दमा, किडनी विकार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. अशा व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सर्वसाधारणपणे इतरांच्या तुलनेत कमी असते. अशा व्यक्तींनी आपली विशेष खबरदारी घेवून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाला अशा रुग्णांची विशेष काळजी घेवून त्यांना वेळेत उपचार देण्याकरीता वरीलप्रमाणे व्याधी असणाऱ्या रुग्णांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात आपली नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याने कोणत्याही वयातील व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होवू शकतो. सद्य:स्थितीत कोरोना विषाणुचा वाढता प्रादूर्भाव व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यात महत्वाचे म्हणजे, मधुमेहीं, रक्तदाब, ह्दयविकार, क्षयरोग, दमा, कर्करोग, किडनी विकार रुग्णांनी अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण अशा व्यक्तींची  रोग प्रतिकार शक्ती ही सर्वसामान्यांच्या तुलनेने कमी झालेली असते आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या आरोग्याबाबत अधिक समस्या उद्भवू शकते. तसेच गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी ही आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच श्वास घ्यायचा त्रास जाणवत असेल किंवा सर्दी-ताप व खोकला अधिक काळ असल्यास त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तसेच मधुमेहीं, रक्तदाब, ह्दयविकार, क्षयरोग, दमा, कर्करोग, किडनी विकार असलेल्या व्यक्तींनी आपल्या नजीकच्या हिंगोली तालुक्यातील सिरसम, नरसी, हाळेगाव, भांडेगाव, सेनगाव तालूक्यातील कवठा, गोरेगाव, साखरा, कापडसिंगी, औंढा तालूक्यातील शिरड शहापूर, जवळाबाजार, लोहारा, पिंपळदरी, वसमत तालूक्यातील हट्टा, हयातनगर, टेंभूर्णी, पांगराशिंदे, कुरुंदा, गिरगांव आणि कळमनुरी तालूक्यातील डोंगरकडा, रामेश्वर तांडा, पोतरा, वाकोडी, आखाडा बाळापूर, मसोड येथील  प्राथमिक आरोग्य केंद्र, तर सेनगांव, औंढा नागनाथ, आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, कळमनुरी किंवा वसमत येथील उप जिल्हा रुग्णालय आणि हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात आपली नोंदणी करावी असेही आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

तसेच सद्य:परिस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढत असून यापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आजारी व्यक्तींच्या संपर्कात राहणे टाळावे आणि स्वच्छ राहण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येत आहे. परंतू जिल्ह्यात अनेक ठिकाणी याबाबत विशेष काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिक बाहेर किंवा बाजारात फिरते वेळी, गरजूंना नागरिक, लोकप्रतिनीधी, सामाजिक संस्था मदत किंवा वितरण करते वेळी मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या करीता जिल्हा प्रशासनामार्फत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दोन  हजार रुपयांची दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे अन्यथा त्यांचे भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

*****


जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन



जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

 

        हिंगोली,दि.26: जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनी ही राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

*****


25 June, 2020

आरबीआयने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व बँकांचे कामकाज सुरु करण्याचे आदेश - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

आरबीआयने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व बँकांचे कामकाज सुरु करण्याचे आदेश

- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली,दि.25: सर्व बँकांचे कामकाज हे आरबीआयने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहे. त्यानुसार खातेदारांसाठी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

            बँकेत येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी एक ते दोन मीटर अंतरावर गोल-चौकोन आखण्यात यावेत तसेच खातेदार आखलेल्या गोल, चौकोनामध्येच उभे राहतील याची दक्षात घेण्यात यावी. खातेदारांना टोकन देण्यात यावेत व टोकन नुसारच व्यवहार करण्यात यावे. टोकननुसार नंबर आलेल्या खातेदारांना माहिती होण्यासाठी पब्लीक अनाऊन्समेंट सिस्टीम बसविण्यात यावी. खातेदार, सुरक्षा रक्षक, बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी मास्क व सॅनीटायझरचा वापर करण्याबाबत सर्व संबंधितांना अनिवार्य करावे. तसेच त्याचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. एकावेळी बँकेमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तीस प्रवेश देण्यात येवू नये. दररोज कामावर येणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच खातेदारांची थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी करण्यात यावी. परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची व हात धुण्याची व्यवस्था व साबणाची व्यवस्था करुन पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परिसिमेचे तंतोतंत पालन करुन बँकेमध्ये व बँकेच्या परिसरामध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. तसेच जागोजागी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावण्यात यावे.

            या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध आहे, असे मानण्यात येईल.

****


औंढा नागनाथमधील घोषित कंटेनमेंट झोन आता प्रतिबंधमुक्त

औंढा नागनाथमधील घोषित कंटेनमेंट झोन आता प्रतिबंधमुक्त

        हिंगोली, दि.25: औंढा नागनाथ येथील गोबाडे गल्ली भागात कोविड-19 चे रुग्ण आढळून आले होते. या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून गोबाडे गल्ली, सिध्दार्थ नगर, सुतार गल्ली, नागेंद्र गल्ली, सोनार गल्ली हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या भागाचे 9 जून, 2020 रोजी सर्वेक्षण करुन एकूण 571 घराची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 3 हजार 775 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. या तपासणी मध्ये संशयित अथवा कोरोनाची लक्षणे असलेली (सर्दी, ताप व खोकला) व्यक्ती आढळून आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात नमूद करुन हे क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.

            त्यामुळे घोषित केलेल्या कंटेनमेंट झोनचा कालावधी 22 जून, 2020 रोजी संपल्याने या परिसरातील व्यक्तींसाठी प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रतिबंधमुक्त केले आहेत.

****


24 June, 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी दक्षता घेण्याचे आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी दक्षता घेण्याचे आवाहन

·   विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर होणार 2 हजार रुपयपर्यंतची दंडात्मक कारवाई

           

हिंगोली,दि.24: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फिरत वेळी काय करावे व काय करू नये याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. ज्यामध्ये सार्वजनिक स्थळी थुंकण्यास बंदी, चेहऱ्यावर कायम मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे इत्यादी बाबींचे पालन करण्याच्या सूचना देवून आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिका विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते.

परंतु जिल्ह्यात नागरिक बाजारात/बाहेर फिरते वेळी विना मास्क असल्याचे तसेच काही सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिक हे गरजूंना मदत वाटप करते वेळी मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यापूर्वीच्या आदेशात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरीकास रु. 500/- दंड अशी कार्यवाही करणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आता या कार्यालयाचे सुधारित आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरीकावर रु. 2 हजार दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

त्याकरीता नागरिकांनी सार्वजनिक स्थळी थुंकू नये. तसेच बाजारात/बाहेर फिरत असताना चेहऱ्यावर कायम मास्क वापरणे व सामाजिक अंतर पाळणे इत्यादी बाबींचे पालन करावे अन्यथा त्यांचे भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानन्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

****

 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्यावर होणार कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्यावर होणार कारवाई

 

हिंगोली,दि.24: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सार्वजनिक स्थळी थुंकण्यास बंदी, चेहऱ्यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे इत्यादी बाबींचे पालन व्हावे याकरिता गैरकृत्याचे स्वरुप करणाऱ्या व्यक्ती विरुध्द दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करणेबाबत आदेश पारीत करण्यात आले होते. परंतू काही नागरिक बाजारात बाहेर फिरते वेळी विना मास्कसह तसेच काही सामाजिक संस्थेचे लोकप्रतिनिधी व नागरिक हे गरजूंना मदत वाटप करतेवेळी मास्कचा वापर करत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

याकरीता सार्वजनिक स्थळी जसे रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय इत्यादी ठिकाणी थुकंल्यास संबंधीतावर स्थानिक स्वराज संस्था (न.प., न.पं. आणि ग्रा.पं.), कार्यालय क्षेत्रामध्ये संबंधित शासकीय विभाग प्रमुख, पोलीस विभाग यांच्यामार्फत प्रथम रक्कम रु. 1 हजार रुपये दंड तर दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, नाक व तोंड सुरक्षितपणे पूर्ण झाकलेले नसणाऱ्या व्यक्तींवर स्थानिक स्वराज संस्था (न.प., न.पं. आणि ग्रा.पं.), कार्यालय क्षेत्रामध्ये संबंधित शासकीय विभाग प्रमुख, पोलीस विभाग यांच्यामार्फत प्रथम रक्कम रु. 2 हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई  करण्यात येणार आहे.

दुकानदार, फळभाजीपाला विक्रेते सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते इत्यादी व ग्राहक यांनी सोशल डिस्टंसिंग न राखणे, ग्राहकांमध्ये कमीत-कमी तीन फुटाचे अंतर न राखणे, विक्रेत्याने मार्किंग न करणे यासाठी  ग्राहकास (व्यक्तीस) प्रथम रु. 200 रुपये दंड तर आस्थापना मालक, दुकानदार, विक्रेता यांना प्रथम रु. 2 हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच किराणा, जीवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावणे यासाठी रु. 5 हजार दंड करण्यात येणार. सार्वजनिक स्थळी रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय इत्यादी ठिकाणी एखादी व्यक्ती विनाकारण आढळून आल्यास प्रथम रु. 1 हजार रुपये दंड दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई तसेच एखादी व्यक्ती दुचाकीवरुन वैयक्तीक वापरासाठी भाजीपाला, किराणा, औषधी इत्यादी घेऊन जात असल्याची बतावणी करुन अनावश्यक फिरत असल्यास प्रथम रु. 1 हजार रुपये दंड तर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या किंवा कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानन्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आवश्यकतेनुसार फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी मोबाईल इत्यादीद्वारे करावे याकरिता स्थानिक स्वराजय संस्था यांनी पोलीस विभागाची मदत घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी निर्गमित केले आहेत.

****

 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन अधीन राहून लग्न समारंभास परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन अधीन राहून लग्न समारंभास परवानगी

 

        हिंगोली,दि.24: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लग्न समारंभास सामाजिक अंतराचे पालन करुन मास्कचा वापर करुन व केवळ 50 नागरिकांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील मंगल कार्यालयामध्ये लग्न समारंभ साजरा करण्यासाठी परवानगी देण्याबाबत निर्णय झाला आहे.

            सद्य:स्थितीत पावसाळा सुरु असल्याने हिंगोली जिल्ह्यातील मंगल कार्यालयामध्ये लग्न समारंभ साजरा करण्यासाठी जास्तीत-जास्त 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न समारंभ साजरा करण्यात यावा, नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, लग्न समारंभावेळी मंगल कार्यालयात सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल तसेच वातानुकुलीत मंगल कार्यालयात लग्न समारंभ साजरा करण्यात परवानगी राहणार नाही. लग्न समारंभ साजरा करण्यापूर्वी व नंतर मंगल कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असणार आहे. वरीलप्रमाणे नियामाचे पालन करण्याची जबाबादारी ही मंगल कार्यालयाचे मालक यांच्यासह वधू-वर पक्षाचे सर्व नागरिक यांची असेल. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या आदेशाची पालन न करणाऱ्या किंवा कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केल्याचे मानन्यात येईल. तसेच संबंधीतावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897 आणि  महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबधीतांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****


23 June, 2020

हिंगोलीत आठ नवीन कोरोना बाधीत रुग्ण


·   सद्यस्थितीत 25 कोरोना बाधीत रुग्ण

हिंगोली, दि.23: आज प्राप्त झालेल्या अहवालातून  नव्याने 08 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाली आहे. यामध्ये वसमत येथील 01 तर कळमनुरी येथील 07 व्यक्तींचा समावेश आहे.
 जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 248 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 223 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 25 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मागणी


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मागणी

            हिंगोली,दि.23: राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी 10 विद्यार्थ्यांकडून पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
            या शिष्यवृत्ती योजनेचा  लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथे उपलब्ध आहेत. इच्छूकांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी, जि. हिंगोली येथे  दि. 25 जून, 2020 पर्यंत सादर करावे.
****

जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी · रोजगाराबाबत माहितीकरीता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी महास्वयंम वेबपोर्टलचा लाभ घ्यावा


जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी
·   रोजगाराबाबत माहितीकरीता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी महास्वयंम वेबपोर्टलचा लाभ घ्यावा

हिंगोली,दि.23: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार, कर्मचारी जिल्ह्याबाहेर गेल्यामुळे उद्योजकांना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ‘कोराना’ च्या पार्श्वभूमीवर बेरोजगार झालेल्या व नोकरी इच्छूक बेरोजगारांना नोकरीची गरज असुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी सदर mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपली नोंदणी करावी. तसेच या वेबपोर्टलच्या माध्यमातून आपल्या आस्थापनातील रिक्त पदांची माहिती प्रसिध्द करावी. या वेबपोर्टलद्वारे  विविध सेवा सुविधा पुरवल्या जातात. यात रिक्तपदे अधिसूचित करणे, बेरोजगारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळ माहितीची उपलब्धता, रोजगार मेळाव्यात सहभाग, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमातून रिक्त पदे अधिसूचित करणे आदी माहिती उपलब्ध करण्यात येते.
तसेच जिल्ह्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांनी या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांनी आपला आधार लिंकसह नोंदणी अद्यावत करावी. तसेच वेबसाईटवर खाजगी व सार्वजनीक आस्थापनामार्फत उपलब्ध होण्याऱ्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा.
जिल्ह्यातील खाजगी/सार्वजनीक अस्थापनांना व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सदर वेबपोर्टलचा लाभा घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
****

22 June, 2020

दिलासादायक : कोरोनामुक्त 11 रुग्णांना डिस्चार्ज


·   आजपर्यंत एकूण 223 रुग्ण बरे झाल्याने दिला डिस्चार्ज
·   बाधीत 17 रुग्णांची प्रकृती स्थिर

हिंगोली,दि.22: जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर मधून कोविड-19 चे बाधीत असलेले 11 रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आले. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड मधील 06 रुग्ण,  कोरोना केअर सेंटर वसमत येथील 01 रुग्ण तर कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमधील 04 रुग्ण असे एकूण 11 रुग्णांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात कोवीड-19 चे एकूण 240 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 223 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 17 रुग्ण बाधीत असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****






औरंगाबाद येथील वेतन पडताळणी पथकाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेली सेवापुस्तके घेऊन जाण्याचे आवाहन


औरंगाबाद येथील वेतन पडताळणी पथकाकडे पडताळणीसाठी
पाठविण्यात आलेली सेवापुस्तके घेऊन जाण्याचे आवाहन

         हिंगोली,दि.22 : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातून ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, औरंगाबाद यांना सादर करण्यात आली होती. त्यांची सेवापुस्तके घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यालयातील जबाबदार कर्मचाऱ्यांस प्राधिकृत करावे. तसेच प्राधिकृत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यासोबत संबंधितास प्राधिकृत केल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे पत्र संबंधिताच्या नमुना स्वाक्षरी व कार्यालयाच्या ओळखपत्रासह व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, औरंगाबाद यांना ज्या पत्रान्वये सेवापुस्तक सादर केले होते. त्या पत्राच्या मूळ प्रतीसह एक छायांकित प्रत (वेतनिका प्रणालीमधून निर्गमित केलेले) सादर करावी. जेणेकरुन मूळ सेवापुस्तक आपल्या कार्यालयास हस्तांतरीत करणे सोयीचे होईल, असे आवाहन पी. डी. पुंडगे, कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****



परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरु · अटी व शर्तीच्या अधीन राहून कामकाजास परवानगी


परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरु
·   अटी व शर्तीच्या अधीन राहून कामकाजास परवानगी

         हिंगोली,दि.22: राज्यातील सर्व परिवहन कार्यालयामध्ये असणारी सर्व कामे जसे अनुज्ञप्ती जारी करणे, शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती विषयक सर्व कामे इत्यादी कामकाज सुरु करण्याचे राज्य परिवहन आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
            या कामासाठी आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉईंटमेंट) प्रणाली सुरु करुन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामासाठी कोटा निश्चित करुन देण्यात आला आहे. येथील उप प्रादेशिक कार्यालयात येणाऱ्या सर्व अर्जदारांना अनुज्ञप्तीचे कामकाज करण्यासाठी खालील अटीचे पालन करावे लागणार आहे.
दोन अर्जदारामध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे. अर्जदाराने मास्क व हॅन्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश करावा. आगाऊ वेळ निर्धारण (अपॉईंटमेंट) असणाऱ्या अर्जदारानाच कार्यालयात प्रवेश दिला जाईल.
            कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील गर्दी कमी ठेवण्यासाठी शासनातर्फे वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड




बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा
पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

हिंगोली,दि.22: जिल्ह्यात बोगस बियाणे संदर्भात तक्रारी येत असुन कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावुन पंचनामे करुन संबधीतांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा कृषी अधिक्षक यांना दिले आहेत़
जिल्ह्यात अनेक गावातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत़ या संदर्भात पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी विजय लोखंडे यांच्याशी दूरध्वनीवरुन  संवाद साधून तक्रारीचा आढावा घेतला़. कृषी अधिकाऱ्यांनी ज्या गावातुन तक्रारी आल्या आहेत, त्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जावुन पंचनामे करावेत. तसेच शेतकऱ्याने वापरलेले बियाणे कोणत्या कंपनीचे आहेत याची तपासणी करुन त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा असे आदेश दिले़ आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर खत पोहचवले जाईल याची काळजी घ्यावी असे सांगून खत टंचाई भासणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या हि सूचना पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या.
****

16 June, 2020

हिंगोलीत एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण


·   सद्यस्थितीत जिल्ह्यात 37 कोरोना बाधीत रुग्ण

हिंगोली, दि.16: पुणे येथून आलेल्या व सद्यस्थितीत वसमत येथील  क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या 25 वर्षीय पुरुषास कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदरील पुरुष वसमत तालुक्यातील मुरुंबा गावचा रहिवासी आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 229 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 192 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 37 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****


15 June, 2020

दिलासा : कोरोनामुक्त 06 रुग्णांना डिस्चार्ज


·  जिल्ह्यात 36 कोरोना बाधीत रुग्ण

हिंगोली, दि.15:  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या 06 कोरोना बाधीत रुग्ण बरे झाल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 228 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 192 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात 36 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****