23 June, 2020

जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी · रोजगाराबाबत माहितीकरीता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी महास्वयंम वेबपोर्टलचा लाभ घ्यावा


जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी
·   रोजगाराबाबत माहितीकरीता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी महास्वयंम वेबपोर्टलचा लाभ घ्यावा

हिंगोली,दि.23: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार, कर्मचारी जिल्ह्याबाहेर गेल्यामुळे उद्योजकांना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ‘कोराना’ च्या पार्श्वभूमीवर बेरोजगार झालेल्या व नोकरी इच्छूक बेरोजगारांना नोकरीची गरज असुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी सदर mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपली नोंदणी करावी. तसेच या वेबपोर्टलच्या माध्यमातून आपल्या आस्थापनातील रिक्त पदांची माहिती प्रसिध्द करावी. या वेबपोर्टलद्वारे  विविध सेवा सुविधा पुरवल्या जातात. यात रिक्तपदे अधिसूचित करणे, बेरोजगारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळ माहितीची उपलब्धता, रोजगार मेळाव्यात सहभाग, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमातून रिक्त पदे अधिसूचित करणे आदी माहिती उपलब्ध करण्यात येते.
तसेच जिल्ह्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांनी या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांनी आपला आधार लिंकसह नोंदणी अद्यावत करावी. तसेच वेबसाईटवर खाजगी व सार्वजनीक आस्थापनामार्फत उपलब्ध होण्याऱ्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा.
जिल्ह्यातील खाजगी/सार्वजनीक अस्थापनांना व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सदर वेबपोर्टलचा लाभा घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
****

No comments: