·
आजपर्यंत
एकूण 223 रुग्ण बरे झाल्याने दिला डिस्चार्ज
·
बाधीत
17 रुग्णांची प्रकृती स्थिर
हिंगोली,दि.22: जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर मधून कोविड-19 चे बाधीत असलेले 11 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आले. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन
वार्ड मधील 06 रुग्ण, कोरोना केअर सेंटर वसमत
येथील 01 रुग्ण तर कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमधील 04 रुग्ण असे एकूण 11 रुग्णांना
आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात कोवीड-19 चे एकूण 240 रुग्ण झाले आहेत.
त्यापैकी 223 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत
17 रुग्ण बाधीत असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची
प्रकृती स्थिर आहे.
नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल
डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपले आणि आपल्या
कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment