10 June, 2020

फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साधणार जनतेशी संवाद



        हिंगोली,दि.10 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेले लॉकडाऊन आणि खरिप हंगाम सुरु झाल्याने शेती विषयक नागरिक व शेतकरी यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनेतेशी संवाद साधणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे जिल्ह्यात कोरोनाच्या परिस्थितीची सद्यस्थिती, तसेच खरिप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांना शेती विषयक असलेले प्रश्न आणि रोजगार हमी योजना या विषयावर संवाद साधणार आहेत. जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली’ या फेसबूक पेजच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी मंगळवार, दि. 16 जून, 2020 रोजी दूपारी 12 वाजता संवाद साधता येणार आहे.
याबरोबरच संवाद कार्यक्रमाच्या दरम्यान ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली’ या फेसबूक पेजच्या कंमेन्ट बॉक्स माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी, उपयुक्त सूचना, प्रश्न जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना विचारता येणार असुन जिल्हाधिकारी या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना किंवा प्रश्न पाठवतांना आपले ठिकाण व तालूका आवर्जून नमूद करावा. हिंगोलीकरांनी या फेसबूक लाईव्ह संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी  व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
*****


No comments: