परराज्यात, राज्यात किंवा जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक
·
आवेदनासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक
हिंगोली, दि.10: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजाराचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी परराज्यात,
राज्यात व जिल्ह्यात अत्यावश्यक व वैद्यकीय कारणासाठी, अडकून पडलेल्या व्यक्ती,
मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाद्वारे ई-पासची सुविधा सुरु
करण्यात आली होती. परंतू दि. 5 जून
रोजीच्या आदेशान्वये ई-पास शिवाय प्रवासाची परवानगी देण्यात आली होती.
परंतू आत हे आदेश रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
यांनी दिली आहे.
त्यामुळे नागरिकांना जिल्ह्यात, राज्यात किंवा परराज्यात अत्यावश्यक व
वैद्यकीय कारणासाठी अडकून पडलेल्या व्यक्ती, मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी
जाण्यासाठी ई-पासद्वारे परवानगी घेवूनच प्रवास करावा लागणार आहे. याकरीता पुढील
अटी व शर्तीनुसार परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये प्रवास करतांना दोनचाकी वाहन केवळ 1
व्यक्तीसाठी, तीन चाकी वाहन 1+2 व्यक्तींसाठी व चारचाकी वाहन 1+2 व्यक्तींसाठी
(चालक+2) यानुसार परवानगी देण्यात येणार आहे. प्रवास करणारे सर्व प्रवासी तसेच
वाहन चालकांना नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवेदनासोबत
जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांमध्ये व इतर ठिकाणी असतांना संबंधिताने
शासनाच्या आदेशानुसार सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असणार आहे.
या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या संबंधीतास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188
अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती
व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19
उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी
कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment