वसमत येथील कुरेशी मोहल्ला कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त
हिंगोली, दि. 26 :- वसमत येथील कुरेशी मोहल्ला
येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आले होते. या
रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून वसमत नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधील कुरेशी मोहल्ला
हे क्षेत्र कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या भागाचे दि.
11 जून, 2020 रोजी सर्वेक्षण करुन 485 घराची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये
2492 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये संशयित अथवा कोरोनाची लक्षणे
असलेली (सर्दी, ताप व खोकला) व्यक्ती आढळून आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी
अहवालात नमूद करुन हे क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.
*****
No comments:
Post a Comment