· सद्यस्थितीत जिल्ह्यात 77 कोरोना
बाधीत रुग्ण
हिंगोली, दि.01:
मुंबई येथून आलेल्या व सद्यस्थितीत औंढा येथील
कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 17 वर्षीय पुरुषास व वसमत येथील
क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या 12 वर्षीय मुलीस असे एकुण दोन जणांना कोविड-19
ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
आजपर्यंत
हिंगोली जिल्ह्यात एकुण 182 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून
स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 105 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 77 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ
डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची
प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी
घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी
घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य
करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत
करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment