कोरोनामुळे 21
वर्षीय तरुणीचा मृत्यू ; तर 22 जणांवर उपचार सुरु
हिंगोली,दि.26:
कोरोनामुळे केंद्रा खुर्द येथील एका 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला
आहे. या रुग्णावर जिल्हा रुग्णालय, वाशिम आयकॉन हॉस्पीटल, अकोला आणि शासकीय
वैद्यकीय संस्था, अकोला येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तिला मुधमेहाचा
आजार होता. काल तिचा अकोला येथे मृत्यू झाला आहे. तिच्या संपर्कातील व्यक्तींना
क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे थ्रोट स्वॅब तपासण्यासाठी पाठविण्यात आले
आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 251
रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 229 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात
आला आहे. तसेच आज घडीला जिल्ह्यात एकूण 22 बाधीत रुग्णांवर उपचार करण्यात येत
आहेत.
हिंगोली जिल्ह्यातंर्गत कोविड-19 ची लागण झालेले व
उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमतमध्ये एकूण 2 कोविड-19 रुग्ण (1 बुधवार पेठ, 1
चंदगव्हाण) येथील रहिवासी आहेत. तर कोरोना
केअर सेंटर, कळमनुरी येथे एकूण 10 कोविड-19 रुग्ण (2 काजी मोहल्ला कळमनुरी, 1
टव्हा, 5 कवडा, 2 गुंडलवाडी) येथील रहिवासी आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर,
कळमनुरी येथे तीन कोविड-19 चा रुग्ण (एस.आर. पी. एफ. जवान्) उपचारासाठी भरती
आहेत. कोरोना केअर सेंटर, लिंबाळा अंतर्गत 5 कोविड-19 चे रुग्ण (1 कन्हेरगाव नाका,
1 संतुकपिंप्री, 1 तालाबकट्टा, 2 रिसाला बाजार) उपचारासाठी भरती आहेत. जिल्हा
सामान्य रुग्णालय हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये एकूण 1 कोविड-19 रुग्ण (1
जवळा बाजार) ज्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. तर कोरोना केअर सेंटर, सेनगाव
येथे 1 कोविड-19 चा रुग्ण (कहाकर बुद्रुक) उपचारासाठी भरती आहे.
हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना
केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर अंतर्गत एकूण 4,233
व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 3,756 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले
आहेत. 3,554 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीला 677 व्यक्ती
भरती आहेत. तर आज रोजीपर्यंत 273 अहवाल येणे प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,
अत्यंत इमरजन्सी असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना
घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे, तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू
ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणांस सदरील ॲप सतर्क करण्यास
मदत करते.
****
No comments:
Post a Comment