01 June, 2020

हिंगोलीत नवीन आठ रुग्ण तर सहा जण कोरोनामुक्त

·  जिल्ह्यात 75 कोरोना बाधीत रुग्ण

हिंगोली, दि.01:  वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या पाच कोविड-19 रुग्णांचा व हिंगोली येथील सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या भिरडा येथील रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना दि. 31 मे रोजी डिस्जार्च देण्यात आला. तर वसमत क्वारंटाईन सेंटर मधील भरती असलेले 06 व्यक्ती व कोरोना केअर सेंटर, हिंगोली येथे भरती असलेल्या 02 बालीकांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 180 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 105 रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात 75 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****


No comments: