22 June, 2020

बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड




बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा
पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

हिंगोली,दि.22: जिल्ह्यात बोगस बियाणे संदर्भात तक्रारी येत असुन कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावुन पंचनामे करुन संबधीतांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा कृषी अधिक्षक यांना दिले आहेत़
जिल्ह्यात अनेक गावातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत़ या संदर्भात पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी विजय लोखंडे यांच्याशी दूरध्वनीवरुन  संवाद साधून तक्रारीचा आढावा घेतला़. कृषी अधिकाऱ्यांनी ज्या गावातुन तक्रारी आल्या आहेत, त्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जावुन पंचनामे करावेत. तसेच शेतकऱ्याने वापरलेले बियाणे कोणत्या कंपनीचे आहेत याची तपासणी करुन त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा असे आदेश दिले़ आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर खत पोहचवले जाईल याची काळजी घ्यावी असे सांगून खत टंचाई भासणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या हि सूचना पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या.
****

No comments: