सुधारीत वृत्त :
हिंगोली, दि.29: जिल्ह्यातील गौकर्ण येथे दि.
1 जुलै, 2020 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गोकर्णा
माळावरील मंदीरावर यात्रा भरणार असून त्या ठिकाणी जाण्यासाठी वगरवाडी, नागेशवाडी,
दरेगाव, औंढा नागनाथ, जिंतूर फाटा येथून भाविक पायी जातात व मंदीर परिसरात मोठ्या
प्रमाणात नागरिक गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी कालावधीत या सर्व उत्सवात
मोठ्या प्रमाणात महिला पुरुष, अबाल, वृध्द, भाविक येत असल्याने त्यांना कोरोनाची
लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर आजारावर अद्यापपर्यंत कुठलाही
प्रतिबंधक उपाय किंवा लस उपलब्ध झाली नसल्याने गौकर्ण येथील यात्रेस जमणाऱ्या
भाविकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, तसेच साथ रोगाचा फैलाव होऊ नये याकरीता
उत्सवात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना, भाविकांना प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्ट्या
अत्यंत आवश्यक आहे. तसेच या पुढील कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविक जमा
होणारे धार्मिक कार्यक्रम मेळावे, यात्रा, महोत्सव साजरा करण्यास जनहितार्थ
प्रतिबंध करणे अत्यावश्यक आहे.
जिल्ह्यात कोरोना रोगाचा
प्रादुर्भाव होऊ नये तसेच जिवीत हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना
म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये गौकर्ण येथील दि. 1 जुलै,
2020 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी होणारी यात्रा रद्द करीत असल्याचे जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment