कन्हेरगांव नाका कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त
हिंगोली,दि.29: हिंगोली तालुक्यातील मौ. कन्हेरगांव नाका येथील वार्ड
क्र. 2 येथे कोविड-19 चा रुग्ण आढळून आला होता. कोरोनाचा
फैलाव होऊ नये म्हणून कन्हेरगांव नाका येथील वार्ड क्र. 2 हे क्षेत्र कंटोनमेंट
झोन म्हणून घोषित करण्यात आले होते.परंतू मौ. कन्हेरगांव नाका येथील रुग्ण हा बरा
झाला असून कन्हेरगाव नाका येथील वार्ड क्र. 2 हे क्षेत्र वगळता सर्व गांव
कंटेन्मेंट झोन मुक्त करणेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात सदर क्षेत्र
प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.
त्यानुसार मौ. कन्हेरगांव नाका येथील
वार्ड क्र.2 चा कंटेनमेंट झोनचा कालावधी संपला असल्याने वार्ड क्र. 2 हे क्षेत्र
वगळता इतर परिसरातील व्यक्तीसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेले क्षेत्र प्रतिबंध मुक्त
करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष
रुचेश जयवंशी यांनी प्रतिबंधमुक्त करण्यात
आल्याचे आदेश काढले आहेत.
****
No comments:
Post a Comment