03 June, 2020

दिलासा : कोरोनामुक्त 45 रुग्णांना डिस्चार्ज



·   आजपर्यंत एकूण 151 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिला डिस्चार्ज
·   बाधीत 32 रुग्णांची प्रकृती स्थिर.

हिंगोली,दि.03: जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर मधून कोविड-19 चे बाधीत असलेल्या 45 रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यात हिंगोली केअर सेंटर मधून खंडाळा येथील 09 तर खांबाळा-01, माळसेलू-01, इंचा-03, वडद-01, भिरडा-01, बासंबा-01, लिंबाळा-01, पेन्शनपुरा-01, बागवानपुरा-04, आनंदनगर-01, सिध्दार्थ नगर-05 या रुग्णांचा समावेश आहे.  तर जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये औंढा तालूक्यातील देवाळा गावातील-01, पहेणी-02, सुरजखेडा-01 रुग्ण आणि  सेनगाव येथील कोरोना केअर सेंटरमधील खुडज-09 तर बरडा येथील 03 असे एकूण 45 रुग्णांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात कोवीड-19 चे एकूण 183 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 151 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 32 रुग्ण बाधीत असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****


No comments: