औंढा
नागनाथमधील घोषित कंटेनमेंट झोन आता प्रतिबंधमुक्त
हिंगोली, दि.25: औंढा नागनाथ येथील गोबाडे गल्ली भागात कोविड-19 चे
रुग्ण आढळून आले होते. या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून गोबाडे गल्ली, सिध्दार्थ
नगर, सुतार गल्ली, नागेंद्र गल्ली, सोनार गल्ली हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून
घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या भागाचे 9 जून, 2020 रोजी सर्वेक्षण करुन एकूण
571 घराची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 3 हजार 775 व्यक्तींची तपासणी करण्यात
आली होती. या तपासणी मध्ये संशयित अथवा कोरोनाची लक्षणे असलेली (सर्दी, ताप व
खोकला) व्यक्ती आढळून आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात नमूद करुन
हे क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.
त्यामुळे
घोषित केलेल्या कंटेनमेंट झोनचा कालावधी 22 जून, 2020 रोजी संपल्याने या परिसरातील
व्यक्तींसाठी प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रतिबंधमुक्त केले आहेत.
****
No comments:
Post a Comment