रिसाला बाजार परिसरात रुग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन घोषित
कंटेनमेंट झोन मध्ये साई माऊली चौक, गणपती मंदीर गल्ली, चिरागशहा
दर्गा रोड, लबडे गल्लीचा परिसर
हिंगोली,दि.3: शहरातील रिसाला बाजार परिसरात
कोविड-19 चा रुग्ण आढळल्याने शहरातील साई माऊली चौक, गणपती मंदीर गल्ली,
चिरागशहा दर्गा रोड, लबडे गल्लीचा आतील भागात कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये
म्हणून हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील
नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या
सेवा आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत.
नागरिकांना आवश्यकत त्या सेवा नगर परिषद, हिंगोली मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार
देण्यात येणार आहेत.
या
आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीलय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे
कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी,
असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment