· सद्यस्थितीत जिल्ह्यात 37 कोरोना
बाधीत रुग्ण
हिंगोली, दि.16:
पुणे येथून आलेल्या व सद्यस्थितीत वसमत
येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती
असलेल्या 25 वर्षीय पुरुषास कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदरील
पुरुष वसमत तालुक्यातील मुरुंबा गावचा रहिवासी आहे.
आजपर्यंत
हिंगोली जिल्ह्यात एकुण 229 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट
झाले आहे. त्यापैकी 192 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 37 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ
डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची
प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी
घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी
घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य
करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत
करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment