15 June, 2020

हिंगोलीत 03 नवीन रुग्ण; तर 42 बाधित रुग्णांवर उपचार सुरु


हिंगोलीत 03 नवीन रुग्ण; तर 42 बाधित रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली, दि.15:  जिल्ह्यात कोरोना बाधीत 03 नवीन रुग्ण आढळले असून, सद्यस्थितीत 42 बाधीत रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यामध्ये सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटर येथे भगवती गावात मुंबई येथून सेनगाव तालुक्यात आलेल्या  03 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना भरती करण्यात आले आहे. तसेच हिंगोली जिल्ह्याअंतर्गत कोविड-19 ची लागण झालेले व उपचारासाठी वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये 02 बाधीत रुग्णांना (कुरेशी मोहल्ला-1, अशोक नगर-1 येथील रहिवासी) उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तर कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर मध्ये  05 बाधीत रुग्णांना (जाम-01, दाती-03, डोंगरकडा-01 येथील रहिवासी) उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. कळमनुरी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये (एस.आर.पी.एफ. जवान)  उपचारासाठी भरती असलेल्या कोविड-19 बाधीत रुग्णास  विशेष काळजी म्हणून त्यास औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटल मध्ये भरती करण्यात आले आहे.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये कोविड-19 चे चोंढी खुर्द-05, सेनगाव-03, रिसाला बाजार-02, नगर परिषद कॉलनी-04, कलगाव-06, सिरसम बुद्रुक-01, ब्राह्मणवाडा-01, सुकळी वळण-01, खानापूर-01,पेन्शनपुरा-04, भोईपुरा-01, कमला नगर-01, सम्राट नगर, वसमत-01 असे एकूण एकूण 31 जणांना कोविड-19 ची लागण झाली असून ते उपचारासाठी भरती आहेत.
आतापर्यत जिल्ह्यातील आयसोलेशन वार्ड व सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 2 हजार 847 व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 347 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यापैकी 2 हजार 307 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. तसेच सद्य:स्थितीत 514 व्यक्ती भरती असून, आज रोजीपर्यंत 110 जणांचा अहवाल येणे प्रलंबित आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 228 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 186 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत 42 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

No comments: